Kranti Sinha Nana Patil Information in Marathi

Kranti Sinha Nana Patil Information in Marathi

क्रांतिसिंह नाना पाटील ( Kranti Sinha Nana Patil Information in Marathi )

    क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म इ. स. १९०० मध्ये सांगली जिल्ह्यातील बहे – बोरगांव या गावी झाला. Kranti Sinha Nana Patil Information in Marathi त्यांचे
मूळ गाव सांगली जिल्ह्यातीलच येदेमछिन्द्र हे होय.

त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र व आईचे नाव गोजराबाई असे होते. नानांनी मराठी सातवीपर्यंत शिक्षण प्रतिकूल परिस्थितीत कसे बसे पूर्ण केले. Details of Kranti Sinha Nana Patil in Marathi.

त्यानंतर ते त्या काळची मुलकी परीक्षा उत्तीर्ण झाले व तलठ्याची काही काळ नोकरी केली.

कार्य :-

१. नाना पाटील यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक  समाजाच्या विचारसरणीचा प्रभाव होता. त्यांनी
सत्यशोधक समाजाचे प्रचारक म्हणून खेडोपाडी फिरून सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांचा प्रचार केला.

समाजातील अंधश्रद्धा,देवभोळ्या समजुती, जातिभेद, हुंडापद्धती यावर त्यांनी कठोर प्रहार केले.

२.  इसवी सन 1926 नंतर नाना पाटील स्वातंत्र्य चळवळीकडे आकृष्ट झाले.
काँग्रेसमध्ये दाखल होऊन परकिय ब्रिटिश सत्तेविरूद्ध संघर्ष करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

त्यासाठी नोकरीला त्यांनीं रामरामही ठोकला.
    सामान्य लोकांनी  सावकारशाही विरुद्ध प्रचाराची आघाडी उघडली समाजातील स्वार्थी भट भिक्षुकशाही विरुद्ध त्यांनी जोरदार प्रचार करून जनजागृती केली.

३.  इसवी सन 1930 मध्ये महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.
या चळवळीचा एक भाग म्हणून जंगल सत्याग्रह करण्यात आला. Details of Kranti Sinha Nana Patil in Marathi

नानाने सांगली जिल्ह्यात जंगल सत्याग्रहात भाग घेतला त्यामुळे त्यांना दोन वेळा कारावासाची शिक्षा भोगावी लागली.

४.  इसवी सन 1940 मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम उघडली.
नाना पाटलांनी या मोहिमेत दोन वेळा सत्याग्रह केला व दोन्ही वेळा त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली.

५.  इसवी सन 1942 च्य चले जाव आंदोलनातील त्यांचे  कार्य अतिशय महत्त्वाचे व चिरस्मरणीय आहे.
या आंदोलन काळात त्यांनी सातारा जिल्ह्यात ब्रिटिश सत्तेच्या विरोधात प्रतिसरकार स्थापन केले.
नाना पाटील हे जनसमुदायाच्या पातळीवर प्रती सरकारचे प्रमुख मानले जात होते.

प्रतिसरकारने तुफान सेना नावाची स्वतः सेना उभारली.
आपली स्वतंत्र न्यायदान व्यवस्था निर्माण करून गोरगरीब जनतेला त्वरित न्याय मिळवून देण्याची त्यांनी व्यवस्था केली.
याशिवाय ग्रामसफाई, साक्षरता प्रसार दारूबंदी, स्वदेशीचा पुरस्कार, यासारखे अनेक विधायक कामे सरकारने हाती घेतली होती.\

**** Kranti Sinha Nana Patil Information in Marathi

यावेळी नाना पाटील  व त्यांचे सहकारी चौरेचाळीस महिने भूमिगत राहिले व सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात
त्यांनी आपली स्वतंत्र शासन यंत्रणा निर्माण केली.

नाना पाटील यांनी या प्रती सरकारचे प्रणेते व नेते या नात्याने केलेल्या कार्यामुळे त्यांना क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले.

६.  स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नाना पाटलांनी प्रथम शेतकरी कामगार पक्षात व पुढे कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला.
Details of Kranti Sinha Nana Patil in Marathi शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शेतकऱ्यांना संघटित करून त्यांनी अनेक लढे उभारले.

शेतकरीवर्गाला त्यांनी केलेल्या या कार्याची दखल घेऊन इसवी सन 1955 मध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती.

७.  कोल्हापूर संस्थानातील प्रजा परिषदेच्या चळवळीस व मराठवाड्यातील रझाकारविरोधी चळवळ त्यांनी
मराठी भाषेत प्रदेशाचे महाराष्ट्रात विलिनीकरण व्हावे म्हणून तो लढा उभारण्यात आला होता.

त्यामध्ये ही क्रांतिसिंह नाना च्या सहभाग होता. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही सहभाग घेतला होता.
त्यांचे वक्तृत्व अत्यंत प्रभावी होते. ग्रामीण समाजात लोकजागृतीचे कार्य त्यांनी अतिशय प्रभावीपणे केले.

अनेक जनआंदोलनात भाग घेऊन त्यांनी कारावासही भोगला होता.
      भारताच्या लोकसभेवर त्यांची इसवी सन 1957 व 1967 मध्ये अशी दोन वेळा निवड झाली होती.

मृत्यु:-

इ. स. १९७६ मध्ये नानांचे निधन झाले. 

RELATED POST